Marathi Kavita...


आम्ही चोरलेल्या मराठी कविता ...

चल शब्दात न सांगितलेलं
, चल शब्दात न सांगितलेआज मी तुला सांगतो, मनातला गुपित माझ्या , आज तुझ्या पुढे मांडतो, कळत नकळतच जुळल, नात आपल्या प्रेम, आज मी हे मानतो.. अन तुझ्यावर खरच ग खूप प्रेम करतो मी ... घे आज मी हे तुला सांगतो... घे आज मी हे तुला सांगतो... ♥ ♥ ------------------------------------------------------------------------- तू माझी होशील का....? भावना मनाच्या तू जाणून घेशील का एकदा सांगणं प्रिये तू माझी होशील का एक क्षणआयुष्याचा तू मजला देशील का त्या क्षणी माझ्यासवे तू रमून जाशील का नयनांच्या माधुशाळेत तुझ्या मला प्रवेश देशील का एकदा का होईना तू माझी प्रीत घेशील का रत्न नगरीचा तुझ्या दृष्टीक्षेप देशील का स्वप्नात का होईना सांग .................... तू माझी होशील का -------- शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना ? अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना ? माझ्याही नकळत दुखावले तुला तर माफ़ मला करशील ना ? ओघळले अश्रु माझे तर अलगद टिपून घेशील ना ? आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ? सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ? चुकतेय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना ? हरवले मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना ? कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ? मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना ? जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ? आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकले , पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ? तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असले तरी माझ्यासाठी..... .....तूच एक असशील ना ?????????







कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें